आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद कॉलेजमध्ये “वाचन प्रेरणा दिन” व “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन!   

Kiran Gopalrao Patil M,88884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

देवचंद कॉलेजमध्ये “वाचन प्रेरणा दिन” व “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन.करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती दिवगंत डॉ ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने देवचंद कॉलेजमध्ये सुवर्ण ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा दृढ व्हावी, तसेच विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास, संस्कृती विकास, मराठी भाषेचा विकास, समाजाची सुसंस्कृत जडणघडण व्हावी, मराठी भाषेचा साहित्याचा विकासाकरिता ग्रंथालयात मान्यवरांची मनोगते व ग्रंथप्रदर्शनात डॉ ए. पी जे अब्दुल कलाम यांची पुस्तके, निवडक व्यक्तीचे चरित्र, आत्मचरित्र ठेवले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन करण्यात आले.

यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. पी पी शाह, यांनी प्रतिमेचे पूजन व आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचनामुळे व्यक्ती सुसंस्कृत, कार्यक्षम, व ज्ञानसंपन्न होते, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. याकरिता विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तीची चरित्रे, आत्मचरित्रे वाचावीत असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत राष्ट्रीय सेवा योजेनेचे प्रमुख डॉ. पी. बी शिलेदार यांनी डॉ ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची व अत्युच्य शिखरावर कसे पोहोचले यांची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमावेळी IQAC चे Co–Ordinator डॉ. पी. बी. शिरगावे, ग्रंथपाल श्री. प्रभाकर. एस. पोळ, राष्ट्रीय योजनेचे प्रमुख डॉ. ए. एस. कांबळे, प्रा. पी. जी. छापखाने, डॉ. आर. एम. साळुंखे, डॉ. ए. एस. डोनर, प्रा. सौ. एस. पी जाधव . व इतर शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील श्री. एस. आर. जबडे, श्री. एस. डी प्रधान, एस.आर मतकरी, श्री. एस.डी पाटील, श्री. एस. एम. गुरव, श्री. दिंगबंर कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार डॉ. पी. वाय पाटील यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!