आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीत नेसा तर्फे 15 डिसेंबरला मॅराथॉनचे आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (14)

येथील निपाणी इंडूरन्स स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १५ डिसेंबर रोजी गोल्ड प्लस निपाणी रासाई हिल मॅरेथॉन (Gold Plus NRHM) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे खजिनदार डॉ. माधव कुलकर्णी यांनी दिली. या स्पर्धेच्या ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी फॉर्मचे अनावरण गोल्ड प्लसचे व्यवस्थापकीय संचालक वरूण त्यागी यांच्या हस्ते करण्यात आले. ५, १० व २५ किलोमीटर अंतरासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, धारवाड, हुबळी ,गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज व निपाणी परिसरातील बहुसंख्येने स्पर्धक सहभागी होतात. स्पर्धेची तयारी करण्यासाठी सचिव आतिष खोत, डॉ संदीप चिखले अध्यक्ष, डॉ. सुहास पाटील उपाध्यक्ष डॉ. शिवा दुमाले, साहिल शाह, तुषार माळी, मंगेश नायर, सुधीर भोजने, जयदीप गुरव, सचिन कुलकर्णी, देव टिंगरे, राजेश घाटे, संदीप शीतल खोत यांच्यासह नेसाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. स्पर्धकांनी आपली नावे ए. के. फायनान्शिअल सर्विस अशोकनगर व हॉटेल साई दर्शनी अकोळ रोड यांच्याकडे नोंदवावीत, तसेच ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने देखील आपण नोंदणी करू शकतो ऑनलाइन नोंदणीसाठी www.teamnesa.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!