आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीचे सुपुत्र डॉ. संदीप चिखले (Ironman) आयर्न मॅन यांचा नागरी सत्कार गुरुवारी!

मलेशिया येथे झालेल्या ट्रायथलॉन (Triathlon) स्पर्धेमध्ये भारतातील वयोगटात प्रथम क्रमांक!

Kiran Gopalrao Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (15)

निपाणीचे सुपुत्र डॉ. संदीप चिखले यांनी मलेशिया लंगकावी येथे झालेल्या ट्रायथलॉन ( Triathlon) स्पर्धेमध्ये 41 ते 44 या वयोगटातून भारतातुन पहिला क्रमांक मिळवला असून सदरची स्पर्धा मलेशिया येथे पार पडली असून यामध्ये एकूण जगभरातील 495 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 

डॉ. संदीप चिखले हे व्यवसायाने जरी वैद्यकीय क्षेत्रात असले तरी त्यांचा सर्व ओढा हा आरोग्याच्या तंदरुस्ती संदर्भात अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्याच्या सहभागानेच मागील चार वर्षांमध्ये अल्पावधीतच यश मिळवलेल्या नेसा संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते त्यामध्ये देखील त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. येत्या 15 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या गोल्ड प्लस निपाणी रासाई हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देखील ते सहभाग नोंदवणार आहेत.

डॉ. चिखले यांनी ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये सलग 4 तास जलतरण 180 किलोमीटर सायकलिंग व 42 किलोमीटर सलग धावूनच हा विक्रम, 17 तासांच्या अगोदर एकाच वेळी पूर्ण करावयाचा असतो. मात्र डॉक्टर चिखले यांनी अवघ्या 13 तास 41 मिनिटे व 16 सेकंद मध्ये हे अंतर पार करून 41 ते 44 या वयोगटात भारतातील वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून सर्व वयोगटांमध्ये भारतातून ते तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये केलेल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मलेशिया स्पोर्ट्स अकॅडमी कडून आयर्नमॅन(Ironman) हा किताब बहाल करण्यात आला आहे.

निपाणी नेसा क्लब मधील आणखी दोन सदस्य श्री सनथ जमदाडे व सहर्ष मेंदगुदले यांनी “वन नेशन वन राईड” (one nation one ride) या थीम खाली अवघ्या 23 दिवसांमध्ये चार हजार किलोमीटर अंतर पार करून काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास पूर्ण केला असून त्यांच्या या मुलखावेगळ्या कामगिरीची देखील नेसाच्या सदस्यांनी दखल घेतली असून. या त्रिमूर्तींची निपाणी सह ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचे ठरवले असून हा सत्कार येत्या गुरुवारी निपाणी येथे संपन्न होणार असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नेसातर्फे कळवण्यात येत आहे.

या त्रिमूर्तींचे निपाणी नगरीमध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता निपाणी मुन्सिपल हायस्कूल ग्राउंड वर आगमन झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा नागरी सत्कार करून त्यांची मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, चन्नमा सर्कल ते जत्राट वेस तिथून बस स्टॅन्ड व पार्वती कॉर्नरला येऊन या मिरवणुकीची सांगता होईल. 

तरी या त्रिमूर्तींच्या नागरी सत्कारास व त्यांच्या एकंदरीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सर्व निपाणीकर एकत्र येऊन त्याला शुभेच्छा देतील असे प्रसिद्धी पत्रकात नेसातर्फे पुढे म्हटले आहे.


ट्रायथलॉन स्पर्धा म्हणजे… एक प्रकारचे खुले आव्हानच..

ट्रायथलॉन ही एक आव्हानात्मक स्पर्धा आहे, ज्यामध्ये तीन भिन्न प्रकारच्या खेळांचा समावेश असतो: जलतरण, सायकलिंग, आणि धावणे. या तीन प्रकारांतून सलगपणे खेळाडूंना स्पर्धा करावी लागते. सामान्यतः स्पर्धा जलतरणाने सुरू होते, त्यानंतर सायकलिंग, आणि शेवटी धावणे होते. प्रत्येक प्रकाराची ठराविक अंतरे असतात, जे स्पर्धेच्या प्रकारानुसार बदलतात.

ट्रायथलॉनमध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि तंत्रज्ञान या गोष्टींची कसोटी लागते. ही स्पर्धा मुख्यतः “आयर्नमॅन” (Ironman) ट्रायथलॉन या स्वरूपात ओळखली जाते, जिथे 3.86 किमी जलतरण, 180.25 किमी सायकलिंग, आणि 42.2 किमी धावणे करावे लागते. हाफ ट्रायथलॉन आणि स्प्रिंट ट्रायथलॉन असेही लहान प्रकार असतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!