आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार अतुल परचुरे यांचे निधन!

गेले कित्येक वर्षे ते कॅन्सरशी झुंज देत होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (14)

गेली अनेक वर्षे मृत्यूशी झुंज देत आपल्या अभिनयाची कला जिवंत ठेवणारे प्रसिद्ध ज्येष्ठ  अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. अतुल परचुरे यांना गेल्या वर्षी कॅन्सरची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी स्वतः याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते कॅन्सर आजराशी झुंज देत होते. त्यावर उपचार घेत होते. यातच मधल्या काळात त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. यानंतर ते पुन्हा कामावरही रुजू झाले होते. सध्या सूर्याची पिल्ले या नाटकासाठी रिहर्सल करत होते. या नाटकासाठी ते खूप उत्सुक होते. पण हे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वी ते मात्र काळाच्या पडद्यात गेल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून मराठी हिंदी चित्रपट सृष्टीसह नाट्य सृष्टीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

परचुरे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील व उद्योज रक्तातील अनेक मान्यवरांनी शोक संदेश पाठवून दुःख व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!