आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीत भर ऊरसाच्या पार्श्वभूमीवर पालीका प्रशासन सज्ज!

नगराध्यक्ष सौ. सोनल कोठडीया यांनी दिल्या होत्या प्रशासनास योग्य सूचना!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (13)

अवघ्या दिड ते दोन महिन्यात आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात प्रशासनावर मजबूत पकड मिळवत आमदार व माजी खासदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ सोनल कोठडीया यांनी शतकोत्तर परंपरा लाभलेला महान अवलिया श्री हजरत पिरानेपीर गौसपाक दस्तगीर साहेब ऊरसास येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनास सज्ज राहण्याच्या सूचना केलेल्या होत्या.

सर्व हिंदू मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या महान अवलिया श्री हजरत पिरानेपीर गौसपाक दस्तगीर साहेब ऊरसास निपाणी व ग्रामीण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ऊरसास येत असल्यामुळे प्रत्येक वर्षी पाणी, रस्ता , गटारी, लाईट या संदर्भात प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असतो. पण यावर्षी या सर्व बाबींचा अगोदरच कानोसा घेतला गेल्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. व अल्पावधीतच आपल्या कार्याचा अविट ठसा उमटवून नगराध्यक्षा सौ.सोनल राजेश कोठडीया हे एक सक्षम नेतृत्व उभारी घेत आहे.

आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष संतोष व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार व  आपल्या सहकाऱ्यांसमवेत मार्गक्रमणा करत पाच दिवस चालणाऱ्या ऊरसास नागरिकांना कोणत्याही त्रासात सामोरे जाऊ नये म्हणून पार्किंगच्या व्यवस्थे सह ऊरसात लावलेल्या स्टॉलच्या वस्तूंमुळे नागरिकांना फिरताना  देखील त्रास होऊ नये अशी देखील खबरदारी प्रशासनाने‌ घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!