आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

इशरा मकानदार व इकरा मकानदार यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पधेसाठी निवड!

पुढची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा मध्यप्रदेश येथे होणार आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी ( 14)

इशरा मकानदार व इकरा मकानदार यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पधेसाठी निवड झाली आहे. दि फिमेल एज्युकेशन सोसायटी, संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी कर्नाटक राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.  नुकत्याच चिक्कमंगळूर याठिकाणी कर्नाटक राज्यस्तरीय तायक्वांदो  स्पर्धा पार पडल्या था स्पर्धेत इशरा नासिर मकानदार (68 Kg वजनी गट) व इकरा नासिर मकानदार (68+ kg वजनी गट) या दोघीनी सुवर्णपदक पटकाविले.. या दोघींनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. त्यांची मध्यप्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ एस जे पाटील पाटील क्रीडा शिक्षिका सौ ए डी..पाटील, वडील नासिर मकानदार आई नेहा मकानदार यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!