आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

म.बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारीच्या चेअरमनपदी श्रीकांत परमणे यांची वर्णी!

व्हाईस चेअरमनपदी प्रताप पट्टणशेट्टी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

आर्थिक विकासासह सामाजिक हित जोपासत सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व नेहमीच पारदर्शक व्यवहार ठेवत अल्पावधीतच अग्रगण्य संस्थेत तुलना झालेल्या निपाणीतील श्री बसवेश्वर क्रेडीट सौहार्द संस्थेची 1991 साली स्थापना झाली. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थापक डॉ. सी.बी. कुरबेट्टी यांनी संस्थेच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे संस्थेचा आलेख वाढत गेला. आज संस्थेने 550 कोटी पेक्षा जास्त ठेवी आणि 435 कोटीचे कर्जे वाटप केली आहेत. त्यामुळे प्रगतीचा आलेख असाच वाढत जाणार असून संस्था 1 हजार कोटीच्या ठेवीचे उदिष्ट पूर्ण करेल. याकरीता सर्वांना सोबत घेवून ही कामगिरी पूर्ण करू असा विश्वास नूतन चेअरमन श्रीकांत परमणे यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या २४ व्या निवडणूकीत चेअरमन म्हणून श्रीकांत परमणे यांची तिसऱ्यांदा चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी प्रताप पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली. नूतन चेअरमन व व्हा. चेअरमनांचा सत्कार मावळते चेअमरन डॉ. कुरबेट्टी व व्हा. चेअरमन सुरेश शेट्टी यांनी केला. निवडणूक अधिकारी म्हणून एम. आर. फत्तार यांनी काम पाहिले. पुढे बोलताना चेअरमन परमणे म्हणाले, संस्थेचा नावलौकिक हा पारदर्शक कारभारामुळे झाला आहे. कार्यरत संचालक मंडळ आणि कार्यतत्पर कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संस्था 1 हजार कोटी ठेवी आणि 700 कोटी कर्ज वितरणाचे उदिष्ट पूर्ण करेल. त्याचबरोबर पाच नवीन शाखा, शाखेच्या नूतन इमारती, कर्ज मेळावा, ठेवी मेळावा, आरोग्य शिबीर, धार्मिक प्रवचने, समाजप्रबोधन, जेष्ठ नागरीकांसाठी मागदर्शन, वधू वर मेळावा असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

संस्थापक चेअरमन डॉ. कुरबेट्टी म्हणाले, समाजातील दुर्बल घटकांना मदत म्हणून संस्थेची स्थापना केली आहे. ते उदिष्ट पूर्ण झाले आहे. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि संकटकाळी मदत दिल्यानंतर त्यांच्या मनाला मिळालेला आनंद हा सर्वोच्च आनंद आहे. त्यामुळे आर्थीक फायदा अथवा नफ्या पेक्षा मानसिक आनंद महत्वाचा आहे. त्यामुळे संस्थेने आर्थिक व्यवहारा बरोबर सामाजिक बांधिलकीसाठी काम करावे असे आवाहन केले. तसेच उद्योग रत्न रतनजी टाटा यांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमणा केल्यास समाज हित जोपासत आर्थिक सुबत्ता येऊ शकते याचा कानमंत्र दिला.

कार्यक्रमास संचालक डॉ. एस आर पाटील  किशोर बाली, श्री प्रताप एस पट्टणशेट्टी, श्री श्रीकांत बी परमणे,  श्री. महेश व्ही बागेवाड़ी, श्री.अशोक लिगाडे श्री सदानंद ए दुमाले, श्री प्रताप जे मेत्राणी, सौ पुष्पा सी कुरबेट्टी, श्रीमती विजया ए शेट्टी, सौ. सुवर्णा पी पट्टणशेट्टी, श्री.सदाशीव एन धनगर, दिनेश पाटील, तसेच आप्पासाहेब परमणे, सोमनाथ परमणे, उमेश खोत, गजानन वसेदार, ॲड. उत्तुरे, अँड. पाटील यांच्यासह संस्थचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक संस्थेचे सी.ई.ओ शशिकांत आदण्णावर यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार राजू खराबे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!