आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद कॉलेज मध्ये महिला आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धांना सुरुवात!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (19)

शुक्रवार दि १८/१०/२०२४ रोजी देवचंद महावि‌द्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आंतरविभागीय हॉलीबॉल (महिला) स्पर्धांना सुरुवात झाली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्हयातील एकूण ११ संघ सहभागी झालेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन महाविदयाल‌याच्या प्राचार्या प्रो. डॉ.जी.डी. इंगळे व डॉ.स्वप्नील पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी निवड समिती सदस्य, प्रा. रमेश पाटील, डॉ. राहुल इंगळे, स्पर्धा निरिक्षक शिवाजीराव पोवार, डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. विकास जाधव, प्रा. काशिनाथ वनमोरे, प्रा सौ. स्मीता जगताप हे उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्या प्रो. डॉ. जी.डी इंगळे म्हणाल्या की देवचंद महाविद्यालयांमध्ये व्हॉलीबॉल खेळाची मोठी परंपरा असून विभागातील प्रत्येक खेळाडूला या महाविद्यालयात येऊन उत्कृष्ट दर्जाचा खेळ सादर करावा असे नेहमी वाटत असते आणि ती संधी या खेळाडूंना लाभली आहे .सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा देऊन खेळाडू वृत्ती दाखवण्याचे आवाहन केले.”

स्पर्धेसाठी पंच म्हणून दिपक चव्हाण, अमित चव्हाण, प्रविण मोरबाळे, अनिल देवडकर, दत्ता ढेंगे, संग्राम तोडकर सुखदेव सजगणे यांनी काम पहिले.

या संपूर्ण स्पर्धेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह व उपाध्यक्षा डॉ सौ.तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजाता पाटील यांनी केले तर आभार डॉ. किशोर गुरव यांनी मानले.

स्पर्धा यशस्वी करणेसाठी संयोजक प्रमुख प्रा डॉ रविंद्र चव्हाण, डॉ. भालचंद्र आजरेकर, दयानंद आनुसे, वैभव सोनार, शिवदास चव्हाण, संतोष वाघेला, विकास कोरे , प्रभाकर पारधी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!