ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीच्या मोर्चा नंतर अवैध धंद्यां विरोधात पोलीसांची धडक कारवाई..

आमदार सुनील शेळके यांच्या आंदोलनानंतर कामशेत पोलिसांनी धडक कारवाईचा सपाटा लावत काल रविवार (दि. २२) रोजी ही कारवाई केली.

राष्ट्रवादीच्या मोर्चा नंतर अवैध धंद्यां विरोधात पोलीसांची धडक कारवाई

आवाज न्यूज: राजेश बारणे, मावळ प्रतिनिधी (कामशेत)22ऑगष्ट.

कोथुर्णे, कडधे, पाथरगाव, नाणे येथील गावठी दारू भट्ट्यांवर कामशेत पोलिसांनी छापा मारत ३६ हजार रुपये किमतीची ८५० लीटर दारू जप्त केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या आंदोलनानंतर कामशेत पोलिसांनी धडक कारवाईचा सपाटा लावत काल रविवार (दि. २२) रोजी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. तर २ आरोपींनी पलायन केले आहे.

कोथुर्णे येथील कारवाईत महेंद्र सजन बिरावत व सलिप्ता थारा बिरावत (दोघे रा. कोथुर्णे, ता. मावळ, जि. पुणे), कडधे येथील कारवाईत परशुराम संतोष राठोड, पार्वती परशुराम राठोड (दोघे रा. कडधे, ता. मावळ, जि. पुणे), पाथरगाव येथील कारवाईत देवीदास रमेश नानावत, साहील रमेश नानावत (दोघे रा. पाथरगाव, ता मातळ जि. पुणे) व नाणे येथील कारवाईत सनी (रा. नाणे, ता. मावळ, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या हद्दीतील कोथुर्णे – मळवंडी ठुले रोडल विशाल ढोले यांच्या विटभट्टीसमोर वर नमूद आरोग्यास शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठादारू तयार करून विक्री करत होते. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी ३ हजार रुपये किमतीची ५० ली. विषारी गावठी हातभट्टी जप्त करत दोघांना अटक केली.

कडधे गावच्या हद्दीतील कडधे पवनानगर रोडच्या उजव्या बाजूला वर नमूद आरोपी आपल्या राहत्या घरासमोर शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी २ हजार रुपये किमतीची ४० ली. विषारी गावठी हातभट्टी जप्त करत दोघांना अटक केली.

पाथरगाव गावच्या हद्दीतील कंजारभट वस्तीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत वर नमूद आरोपी शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीची 1000 ली
हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीची ७०० ली. विषारी गावठी हातभट्टी जप्त केली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पलायन केले.

नाणे गावच्या हद्दीत नाणे ते नाणोली रोडलगत राहत्या घराच्या पाठीमागे वर नमूद आरोपी शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होता. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी ३ हजार रुपये किमतीची ६० ली. विषारी गावठी हातभट्टी जप्त करत एकाला अटक केली. पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!