आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाचे सुयश..!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणगले येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जयसिंगपूर कॉलेज संघाचा सलग दोन सेटनी पराभूत केला, तर उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान आण्णासाहेब डांगे कॉलेज संघाचा दोन सेटनी पराभव केला. अतिशय चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात डी.आर.माने संघाला कडवी लढत दिली परंतु (22-25, 23-25) अश्या गुण फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

 उपविजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे

 १.शुभांगी खामकर,(कर्णधार) 

२.तेजस्विनी मगदूम, 

३.सना किल्लेदार, 

४.विना खंदारे, 

५.यशश्री कुंभार, 

६.सलोनी पाटील, 

७.मृदुला मुरगुडे. 

          उपविजयी संघाची निवड देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे दिनांक १८/१०/२०२४ रोजी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी झाली आहे. संघाच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व घटका मार्फत कौतुक होत आहे.

 विजयी संघाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार मा. सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह  यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. भालचंद्र आजरेकर जिमखाना कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!