ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कुदळवाडीत योग प्राणायम शिबीराचे आयोजन..

रोगप्रतिकारक शक्तीच्या मजबुतीसाठी नागरिकांनो शिबिरात सहभागी व्हा – दिनेश यादव…

सोमवारी (दि. २१) रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कुदळवाडीत तात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण येथे सकाळी ठीक ७.०० वा. योग प्राणायम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

उपस्थितांना पतंजली योग समितीचे प्रशिक्षक योग, प्राणायाम व ध्यानाचे धडे देणार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मनाचे सामर्थ्य वाढवून सकारात्मक विचार उत्पन्न व्हावेत, यासाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते.

त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा पिपंरी चिचंवड शहर व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडीच्या वतीने स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!