कला दिग्दर्शक राजू साप्ते यांची आत्महत्या
पुणे :राजधानी एक्सप्रेस, मान्या द वंडर बॉय यासारख्या चित्रपटांचे कलादिग्दर्शक राजू सातपुते यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी चित्रपटसृष्टीतील लेबर युनियनची संबंधित राकेश मौर्य यांच्यावर गंभीर आरोप केलेआहेत .
मला न्याय देण्याचा प्रयत्न करा :
राजू यांनी या व्हिडिओमध्ये त्यांना राकेश मौर्य कशा प्रकारे त्रास देत होते हे सांगितले आहे. माझ्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. मी सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले आहेत. तरीही राकेश मौर्य काही मजुरांकरवी फोन करून मला त्रास देत आहेत असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या सर्व बाबींना कंटाळून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे त्यांचे अखेरचे शब्द होते .
युनीयनची दादागिरी यामुळे समोर आली आहे.प्रोडयूसर असोसिएशनचे या युनियन वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही असा खुलासा यामधून होतोय. यानिमित्ताने पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीतील झगमगत्या विश्वा मागचे काळे वास्तव बाहेर आले आहे.