मुंबई :भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘ट्रॅजेडी किंग’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वयाच्या ९८ व्यावर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज सकाळी ७:३०वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. नितीन गोखले यांचे पथक उपचार करत होते .
१९४०च्या दशकात ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.अंदाज, नया दौर, देवदास अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. ऐंशीच्या दशकात त्यांनी चरित्रात्मक भूमिका केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.
१९९४ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.