ताज्या घडामोडी

पुणेकरहो खूशखबर!आता केवळ दहा रुपयात वातानुकूलित बस प्रवासाची संधी

पुणे महानगरपालिकेची 'पुण्यदशम' बस प्रवास योजना

पुणे: महानगरपालिकेच्या वतीने पुण्यदशम योजनेअंतर्गत पुणेकरांना अवघ्या दहा रुपयात वातानुकूलित बस प्रवासाची संधी देण्यात आली आहे.

महानगरपालिकेने अवघ्या दहा रुपयात वातानुकूलित बस प्रवास योजना आणली आहे. ‘पुण्यदशम’ असे या योजनेचे नाव असून यामध्ये पहिल्या टप्प्यात २ जुलैपासून आकर्षक गुलाबी रंग संगती मधील ५० मीडी बसेसमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये प्रवास करता येणार आहे. या योजनेअंतर्गत दिवसभरात दहा रुपयात कितीही वेळा प्रवास करता येईल.

पहिल्या टप्प्यात डेक्कन ते पुलगेट ,स्वारगेट ते पुणे, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावरील सर्व पेठा व मध्यवर्ती भागांचा समावेश करण्यात आला आहे.

महापालिकेच्या २०२०-२१ अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडण्यात आली होती. या योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. सीएनजी वरती चालणा-या या मीडी बसची आसनक्षमता २४ आहे. पहिल्या टप्प्यात ५० मीडी बसेस धावतील . तर डिसेंबरमध्ये अजून ३०० बस पुण्याच्या रस्त्यावर धावण्यास सज्ज होतील.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (९ जुलै रोजी) योजनेचे उद्घाटन होईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!