ताज्या घडामोडी

आदर्श शिक्षक सुखदेव माने कालवश

तळेगाव दाभाडे :जुन्या पिढीतील इंग्रजीचे अध्यापक आणि आदर्श शिक्षक सुखदेव कृष्णराव माने (वय 87) यांचे मंगळवारी (ता.6 जुलै) रात्री येथे वृद्धापकाळाने निधन झाले. अथर्व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित माने यांचे ते वडील होत.

कै.सुखदेव माने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रयत शिक्षण संस्था आणि मायणी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत त्यांनी इंग्रजीचे अध्यापक म्हणून 39 वर्षे काम केले. इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासनात अधिकारी असून शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत

कै.सुखदेव माने हे मूळचे सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे शेतकरी कुटुंबातील सदस्य होते.त्यांचे सुपुत्र डॉ. अजित माने हे अस्थिरोग तज्ज्ञ असून दोन मुली डॉक्टर तर एक मुलगी प्राध्यापक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!