ताज्या घडामोडी

मास्टर ऑफ ग्लोबल बिझनेस अभ्यासक्रमात सत्यम खांडगे याला सुवर्णपदक

तळेगाव : येथील सत्यम गणेश खांडगे यांने एस.पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेतून ‘जागतिक व्यापार’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुवर्णपदक मिळवत पूर्ण केला.

तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूलचे मुख्य प्रवर्तक, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश खांडगे यांचे ते चिरंजीव आहेत.

सत्यमला हे सुवर्णपदक एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे डिन नेटफ्लिक्स कोफाउंडर यांच्या हस्ते प्रदान केले गेले. ही संस्था जागतिक नामांकित २० एमबीए प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे.

सत्यमचे प्राथमिक शिक्षण तळेगावातील माउंट सेंट अॅन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण निगडी येथे सेंट उर्सुला स्कूल व इंदिरा कॉलेजमध्ये बीबीए झाले आहे. त्यानंतर त्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम एस. पी.जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटच्या ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई येथील केंद्रातून पूर्ण केला.त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!