ताज्या घडामोडी

आमदार सुनील शेळके, चंद्रभान खळदे व महेश बेंजामिन मित्र परिवाराच्या वतीने महाड पूरग्रस्त भागाला मदत

मावळ: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके,चंद्रभान खळदे व महेश बेंजामिन मित्र परिवाराच्या वतीने महाड पूरग्रस्त भागाला मदत कार्य करण्यात आले. महाड येथील भावे या गावाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे सरचिटणीस  महेश बेंजामिन व त्यांची पत्नी  मोनिका महेश बेंजामिन या कुटुंबाने भेट दिली.

यावेळी तेथील ग्रामस्थ माता-भगिनींना ब्लॅंकेट व साडीचे वाटप करण्यात आले. यावेळी महेश बेंजामिन म्हणाले,” ही मदत नसून ते कर्तव्य आहे. ज्या भगवंताने तुम्हाला घडवलं त्याच भगवंताने मला देखील घडवलं म्हणून या जगामध्ये आपलं माणुसकीचं नातं व धर्माचं नातं आहे म्हणून या कर्तव्याने आम्ही हे करीत आहोत.”

यावेळी मोनिका बेंजामिन उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगांव दाभाडे ( महिला) यांच्या वतीने सर्व माता-भगिनींना साडी व ब्लॅंकेट देण्यात आले. यावेळी भावे गावचे सरपंच जाधव यांनी आमदार सुनिल अण्णा शेळके, चंद्रभान खळदे व महेश बेंजामिन मित्र परिवाराचे आभार मानले .सर्व ग्रामस्थांनी आमच्या ह्या छोट्याशा गावाला आपण स्वतःहून भेट द्या अशी आग्रहाची नम्र विनंती आमदार सुनील आण्णा शेळके यांना केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!