ताज्या घडामोडी
श्री नाना शिंदे यांचे निधन
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड मधील पत्रकार, उद्योजक नितीन शिंदे आणि परिवहन महामंडळातील कर्मचारी विकास शिंदे यांचे ते वडील भुईंज : जांब, ता. वाई येथील ज्येष्ठ नागरीक श्री. नाना धोंडी शिंदे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने शुक्र. दि.२३ रोजी रात्री उशिरा निधन झाले. श्री. नाना शिंदे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी जांब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.