ताज्या घडामोडी

मावळातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करा – किरण गायकवाड

लोणावळा : राज्य शासनाच्या आदेशानुसार 15 ऑगस्टपासून सर्व हॉटेल्स, दुकाने,चौपाट्या उद्याने जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत. याच धर्तीवर लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली करावीत अशी मागणी मी लोणावळेकर ग्रुपचे संस्थापक डॉ. किरण गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इमेल द्वारे केली आहे.

तालुक्यातील पर्यटन स्थळावर छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात.या व्यवसायिकांचा उदरनिर्वाह येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे होतो. लोणावळा व खंडाळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचे अर्थचक्र पर्यटनावर अवलंबून आहे. परंतु या शहरातील व मावळातील पर्यटन स्थळे बंद असल्याने व्यावसायिकांचे अक्षरशा: कंबरडे मोडले आहे.शहरातील टूरिस्ट व्यवसाय ठप्प झाला आहे तसेच छोटे टपरीधारक, चहा, मका, वडापाव, भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे मावळ व परिसरातील पर्यटन स्थळावरील बंदी उठवावी व व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी डॉ. गायकवाड यांनी केली आहे.या मागणीचे ई-मेल त्यांनी मुख्यमंत्री, पालक मंत्री व जिल्हाधिकार्‍यांना  पाठविले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!