ताज्या घडामोडी

गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास पाठलाग करून पकडले ;13 ,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामशेत : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोवित्री ते कोलवाडी दरम्यान पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजाची तस्करी करणा-या वाहनास पाठलाग करत पकडले.या कारवार्इत 13,75,000 रूपयांचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक  रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात,प्रकाश वाघमारे,मुकुंद कदम,दत्तात्रय जगताप,पोहवा सचिन घाडगे,मुकुंद आयचीत ,प्रमोद नवले , प्राण येवले  हे पुणे ते मुंबई रोडने पेट्रोलिंग करीत असताना कामशेत पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे गोवित्री गावाचे जवळ आले असता गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कामशेत पो स्टे प्रभारी पोनि संजय जगताप , सपोनि आकाश पवार , पोहवा अजय दरेकर यांचे मदतीने बंदोबस्त लावून एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी (MH 12 GH 4173) नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात कोलवाडीच्या बाजूकडे जाताना दिसली. त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने व मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे गाडीची खात्री पटल्याने सदर वाहनास अडथळा आणून पकडले .गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 25 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.गाडीत असलेल्या दोन जणांपैकी गाडी चालक व मालक संजय मोहिते (रा. गोवित्री) हा पळून गेला. तर सुनिल भाऊ केदारी (रा. कोलवाडी )ता.मावळ,जि. पुणे याला ताब्यात घेण्यात आले.

सनील भाऊ केदारी याला कामशेत पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा नोंद करण्यात आला . त्याच्याकडून 03,75,000 रुपये किंमतीचा गांजा व अंदाजे 10,00,000 रुपये किमतीची जुनी वापरती ब्रिझा गाडी असा एकूण 13,75,000 पये किंमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

सदर आरोपी हा सरार्इत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून कामशेत पोलिस ठाण्याचे स पो नि आकाश पवार अधिक तपास करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!