महेश बेंजामिन यांची ख्रिश्चन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
तळेगाव : महेश बेंजामिन यांची ख्रिश्चन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष माननीय रेव्हं संजय लोंढे व प्रदेश कोर कमिटीने चाकण या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बैठकीत निवड जाहीर केली.
महेश बेंजामिन हे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असून त्यांची नुकतीच शासन नियुक्ती दक्षता कमिटी वर निवड झालेली आहे. आमदार सुनील आण्णा शेळके यांचे ते समर्थक असून सामाजिक कार्यामध्ये यापूर्वी त्यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत.
महेश बेंजामिन हे सेवा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून ख्रिश्चन समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश ख्रिस्ती समाजाची असलेली महा संघटना ख्रिस्ती समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यावर काल चाकण या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड केली.