ताज्या घडामोडी

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा १२ वीचा निकाल १०० टक्के

चिंचवड :चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे सी.बी.एस.ई. बोर्ड (दिल्ली) चा ज्युनिअर कॉलेज इयत्ता 12 वीचा निकाल100 टक्के  लागला.

त्यात हेमांगी कश्यप हिने प्रथम क्रमांक पटकावित 95 टक्के गुण मिळविले. दुसरा क्रमांक खुशी मांडोत व ईशल शेख हिने 94.14 टक्के गुण प्राप्त केले. तर, तिसरा क्रमांक केवीन कार्तिक ह्याने 93.17 टक्के गुण प्राप्त केले. कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, समन्वयिका खुश्नुमा सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!