ताज्या घडामोडी

लोणावळा शहरात व ग्रामिण भागात  गौराईंचे वाजतगाजत  आगमन..

लोणावळा ता.१३ ( प्रतिनिधी ) गणपती बाप्पाचे आगमनानंतर यांचे माता-पिता गौराई आणि शंकर यांचे रविवारी  सायंकाळी वाजत गाजत आगमन झाले. ढोल ताशांचे गजरात  गावोगावी  गौराई आल्याने  सर्वञ उत्साह सःचारला असल्याचे वातावरणात दिसले.
गौरी गणपतीची  सजावट ,उपवास ,  आरती ,मोदक, प्रसाद आदींनी  घरोघरी  रोषणाई पहायला मिळाली.  औंढोली  गावात सर्व गणपतीचे समोर भजन करण्याची व राञभर जागून गणपती बाप्पा यांचेसमोर  आरती करण्याची  गेले अनेक वर्षे चालू असून गतवर्षी खंड कोरोनाच्या पाश्वभूमिवर  पडला ; यावर्षी  माञ ही परंपरा  चालू ठेवण्यात  आली. गणरायाला  सर्व ग्रामस्थांनी  साकडे घातले की कोरोना दूर जावू दे व तुझी उत्सहात सेवा करण्याची संधी मिळू दे. ! !
ओंकार स्वरूपा, एक गावू आम्ही ,  ओंकार  प्रधान रूप गणेशाचे  , हे तीन्ही देवांचे जन्मस्थान  ! ! अशा आभंगांनी  घरोघरी   टाळ मृदूंग यांचा नाद घुमला.
घरोघरी महिलांनी गौराईंचे आगमन प्रसंगी  गाणी म्हटली. दारात रांगोळी काढून स्वागत केले . वातावरण फुलून  गेले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!