ताज्या घडामोडी
बोपखेलमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठांना तुळशी रोप व आरोग्य किटचे वाटप
चिंचवड : येथे बोपखेलमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठांना तुळशीचे रोप व आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवसेना शाखा बोपखेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विठ्ठल घुले, पाटील घुले, काळेकाका, मारुती मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन तुळशीचे रोप भेट देण्यात आले. आरोग्यवर्धनी तुळशीप्रमाणे सर्व जेष्ठांच्ये आरोग्य राहो ही सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हरिओम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव घुले यांची भेट घेऊन संघास आरोग्य किट व तुळशीचे रोप भेट देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख नामदेव घुले, रवी कोवे,दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी, मारुती मोरे ,नंदू घुले ,प्रल्हाद घुले,आबा वहिले,भाग्यदेव घुले व संतोष गायकवाड उपस्थित होते.