ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद स्कुलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

तळेगाव : येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव  मिलिंद शेलार,  मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा,  प्राथमिक विभाग प्रमुख  धनश्री पाटील तसेच शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी याप्रसंगी शालेय परिसराची स्वच्छता केली विद्यार्थ्यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट उपक्रमाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून सुबक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा आनंद घेतला.

स्वच्छता अभियान व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे या उपक्रमांचे संस्थेचे अध्यक्ष  संतोष खांडगे शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे व सचिव  मिलिंद शेलार सर यांनी कौतुक केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!