ताज्या घडामोडी

आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सोमवारी लोणावळा शहरात बैठक

लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सोमवारी ( 4 ऑक्टोबर ) रोजी लोणावळा शहरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आरपीआयचे लोणावळा शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गायकवाड, महिला अध्यक्ष यमुना साळवे, महिला अध्यक्ष मालन बनसोडे, उषा जाधव, धम्मरक्षित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले, की राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका व वाटचाल याविषयी बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच महिलांवरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी पक्ष आपली भूमिका मांडेल.कोरोना काळात थकीत लाईट बिलांची नागरिकांकडून सक्तीने वसुली केली जात आहे.आधीच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्य नागरिकांना बिल भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!