ताज्या घडामोडी

नगरसेविका मंगल जाधव यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काँक्रिटीकरण

तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषद प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेविका  मंगल सुरेश जाधव यांच्या प्रयत्नातून दाभाडे आळी व साने आळी परिसरातील  अमर दाभाडे यांचे घर ते  प्रकाश दवणे यांचे घर व गुंड वाड्यापर्यंत अनेक वर्ष प्रलंबित असलेला अंतर्गत रस्ता संपूर्ण काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ काल रविवार (दि. 3 ऑक्टोबर ) रोजी करण्यात आला.

या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका  मंगल सुरेश जाधव,स्वीकृत नगरसेवक  संतोष दाभाडे,भाजपा शहराध्यक्ष  रवींद्र माने, सचिन जाधव,भाजपा उपाध्यक्ष संजय  दाभाडे , श्रीदर्शन गुंड,  पांडुरंग सावंत, आनंद दाभाडे , प्रकाश दवणे , अमर दाभाडे , विजय दाभाडे, सुनील दाभाडे , कुमार आगरकर , भिमराव निगडकर , ज्ञानेश्वर गुंड ,आकाश लोखंडे , राऊत ,महिला भगिनी  नंदा  दाभाडे,  सुरेखा  दवणे , दिशा खोल्लम, कुसुम राऊत व परीसरातील महिला भगिनी  उपस्थित होत्या.

या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे काल शुभारंभ करुन नगरसेविका  मंगल जाधव आणि  सचिन जाधव यांनी स्वतः थांबून हे काम पूर्ण करून घेतले.यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष संजय दाभाडे यांचा वाढदिवसानिमित्त उपस्थितांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!