ताज्या घडामोडी

शाळा सुरू झाल्याने विद्यालयाचे आवारात विद्यार्थी व शिक्षक यांची दीड वर्षांनी भेट

लोणावळा  : तब्बल दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजल्याने आज औंढे खुर्द येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयात सोशल डिस्टंटीँगचे पालन करीत विद्यालयात सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांना मास्कचे वाटप करून वर्ग सुरू करून प्रत्यक्ष ज्ञानार्जन शिक्षकांच्या वतीने करण्यात आले.

गेले अनेक दिवस या शाळेत शिक्षक येत होते .काही वीस ते पन्नास टक्के विद्यार्थी मोबाईल नसल्याने शाळेत येवून शिक्षण घेत होते. तर अनेक विद्यार्थी आॕनलाईन शिक्षण घेत होते. आज शासनाच्या आदेशानुसार अधिकृतरित्या विद्यार्थी नागनाथ माध्यमिक विद्यालय येथे ठरलेल्या वेळेत उपस्थित होते.

शाळेतील मुख्याध्यापिका  अनुराधा  देशमुख,शिक्षिका  मंडले शिक्षक  पावशेरे सर ,.पवार सर, काळे सर तसेच लिपिक आणि शिपाई आज ४ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 100% उपस्थित होते.

तसेच सुमारे ६० % विद्यार्थी उपस्थित होते. रोज दहा , ते पन्नास टक्के विद्यार्थी आडीआडचणी असल्यास शाळेत येत होते. आज शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मास्क वाटप करून केले गेले . ग्रामपंचायतीचे वतीने मास्क देण्यात आल्याचे मुख्याध्यापिका देशमुख म्हणाल्या . शाळेत संस्थेच्यावतीने सॕनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती.ग्रामपंचायतीचे वतीने सॕनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्यास फार चांगले होईल, अशी शिक्षक व विद्यार्थी यांनी मागणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!