ताज्या घडामोडी
अचानक आलेल्या पावसाने लोणावळाकरांची उडाली तारांबळ
लोणावळा : शहरात आज सकाळपासून स्वच्छ वातावरण होते. गेल्या दोन दिवसांपासून लख्ख ऊन पडल्याने नागरिक सुखावले होते. परंतु आज दुपारी तीन नंतर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोणावळेकरांना गाठले. दुपारी ढगांच्या गडगडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. काही नागरिकांनी पावसासाठी छत्री, रेनकोट सोबत न बाळगल्याने त्यांची तारांबळ झाली. नागरिक मिळेल तिथे आडोसा घेत पावसापासून स्वतःचा बचाव करत होते.