ताज्या घडामोडी

विश्व हिंदु परीषद बजरंग दलच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपुजन

तळेगाव : येथे विश्व हिंदु परीषद बजरंग दल तळेगाव दाभाडे प्रखंडच्या वतिने विजयादशमी (दसरा) निमित्त येथील शिवकालिन श्री खंडोबा मंदिर येथे शस्त्रपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता.

या कार्यक्रमात श्री खंडोबा मंदिर मधील मानाचा खंडा,कट्यार,गदा, दख्खनी तलवार, माराठा धोप,आदि शस्त्रांचे पुजन तळेगाव दाभाडे संस्थानचे श्रीमंत सरदार सरसेनापती सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, अ.सौ.याज्ञसेनीराजे दाभाडे  यांच्या हस्ते झाले.

यावेळी विश्व हिंदु परीषद अध्यक्ष जीवन टेकवडे, मंत्री कपिल देवाडिगा, बजरंग दल संयोजक ओंकार भेगडे ,आखाडा प्रमुख अक्षय कोडितकर, सामाजिक समरसता प्रमुख आकाश ठोंबरे, प्रणव दाभाडे , कुणाल जव्हेरी ,हर्षद सांडभोर, गणेश निसाळ , आकाश पवार तसेच खंडेराया मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!