ताज्या घडामोडी
शिववंदना ग्रुप मावळ तालुका अध्यक्षपदी तुषार वहिले
वडगाव : शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य मावळ तालुका अध्यक्षपदी वडगावच्या तुषार वहिले यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांनी वहिले यांना निवडीचे पत्र दिले. हा ग्रुप महाराष्ट्रातील किल्ल्यांवर मोहिमा आयोजित करतो. गडांची व किल्ल्यांची स्वच्छता करण्याचे काम ग्रुपच्या वतीने केले जाते. तसेच किल्ल्यांवर आलेल्या शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे विचार सांगून प्रेरित केले जाते व शिव वंदना म्हटली जाते.