ताज्या घडामोडी

प्रतिभा महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरु

परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालकांना लसीकरणाचे आवाहन

चिंचवड  : महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य या मोहिमे अंतर्गत पिंपरी चिंचवड मधील प्रतिभा महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरणास आज मंगळवार रोजी सुरुवात करण्यात आली. दि.२७ व २८ रोजी चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात सकाळी १० ते ४ या वेळेत सुरु राहणार आहे.

लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आकुर्डी येथील महानगरपालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच १८ वर्षावरील लस घेणारी विद्यार्थिनी देखील उपस्थित होती. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासन अधिकारी, डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, संयोजक प्रा. सुवर्णा गोगटे, डॉ. जयश्री मुळे, डॉ. विलास बोरकर, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. सुप्रिया शेटे, डॉ. गोरख कटवे (आरोग्य शिक्षण अधिकारी), डॉ. संदीप जगताप (आरोग्य शिक्षण अधिकारी) व आकुर्डी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग इ. मान्यवर उपस्थित होते. सदर मोहीम आणखी दोन दिवस चालणार असून या लसीकरण मोहिमेत कोव्हीशिल्डची लस दिली जाणार आहे. परिसरातील नागरिक व विद्यार्थी व त्यांचे पालक यांना या दोन दिवसात कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि ८४ दिवसानंतरचा दुसरा डोस घेण्यासाठी महाविद्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उपस्थित राहून लस घ्यावी असे आवाहन मुख्य प्रशासन अधिकारी (सन्माननीय) डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.

लसीकरण मोहिमेच्या उद्धाटनाप्रसंगी लसीकरणाचे महत्व जनजागृती करण्यासाठी प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लस घ्या, लस घ्या हे पथनाटय सादर केले त्याला उपस्थितानी प्रतिसाद दिला सुमारे अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग धेतला सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा अरविंद बोरगे, प्रा अश्लेषा देवळे यांनी मार्गदर्शन केले. सचिन ढंगारे, ओकार माडगे, रोहन शिंदे, पूजा काळे आदी विधार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!