ताज्या घडामोडी

मावळ तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वडगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ प्रणित मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज बुधवार (10 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11 वाजता वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोर विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, उपाध्यक्ष जीवन गायकवाड, सरचिटणीस सुखदेव गोपाळे यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी 10 ऑगस्ट 2020 पासून परिमंडळ निहाय वेतन वाढ व त्याची थकबाकी मिळावी, गोठवण्यात आलेला राहणीमान भत्ता मागील थकबाकीसह वाढवून मिळावा, ग्रामपंचायतीने कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करावी व त्याचा हिशोब ठेवून बँकेत भरणा करावा, सेवापुस्तक अद्यावत करावे, थकीत राहणीमान भत्ता (1/7/ 2007 पासूनचा) मिळावा, कर्मचाऱ्यांना गणवेश, बूट, बॅटरी इत्यादी साहित्य पुरवण्यात यावे, या मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शंखध्वनी करत आंदोलन केले.

कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन शेळके यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!