ताज्या घडामोडी

भाजपा भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रभारीपदी विजय फुगे

चिंचवड : शहर भाजप कार्यकारणीमध्ये सरचिटणीस पदावर कार्यरत असणाऱ्या विजय फुगे यांची भाजपा भोसरी विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने विजय फुगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!