ताज्या घडामोडी

कार्ला येथे 16,17,18 नोव्हेंबर रोजी शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन

कार्ला : येथील शृी.एकविरा विद्या मंदिर व गुप्ता महाविद्यालय येथे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून दिनांक 16,17,18 नोव्हेंबर 2021 रोजी शासन आपल्या ह्या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर अभियानाच्या नियोजनासाठी नियोजन पूर्व बैठक कार्ला एमटीडीसी येथे पार पडली.ह्या अभियानात जातीचे दाखले,उत्पन्नाचा दाखला,नवीन जॅाब कार्ड काढणे,नवीन रेशनकार्ड काढणे,दुरूस्ती करणे,कोव्हिड 19 लसीकरण,नवीन आधारकार्ड काढणे,दुरूस्ती करणे,कृषी विभागातील सर्व योजना,पंतप्रधान पीक विमा योजना,आरोग्य विभाग व पशुवैद्यकिय सर्व योजना,पंतप्रधान मातृवंदना योजना,शबरी घरकुल योजना/रमाई घरकुल योजना,इंदिरा आवास घरकुल योजना,संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व योजना,वैयक्तिक स्वरूपाचे सर्व लाभ इत्यादी योजनांचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

ह्या योजनांचा कार्ला परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी केले.

यावेळी शासनाच्या वतीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कारंडे,आरोग्य अधिकारी पोळ मॅडम,कृषी विभागाचे कुलकर्णी ,महावितरणचे चव्हाण सर्व ग्रामसेवक ,शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी,शिवसेना संघटक सुरेश गायकवाड,पुणे विद्यापीठ युवा सेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,विभाग संघटक एकनाथ जांभूळकर,युवा सेना समन्वयक दत्ता केदारी, शिववाहतूक सेना अध्यक्ष पंकज खोले,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष गिरी, गृामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,वत्सला हुलावळे,
युवा सेना चिटणीस बंटी हुलावळे,विनायक हुलावळे ,
यशवंत येवले,काळू हुलावळे ,सुभाष खोले,नितिन देशमुख,राजेश फुणसे,अक्षय हुलावळे ,आदित्य हुलावळे ,किरण गायकवाड उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!