ताज्या घडामोडी
इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बंडा जोशी यांच्या ‘हास्यपंचमी’ कार्यक्रमाचे आयोजन
तळेगाव : इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बंडा जोशी यांच्या एकपात्री हास्यपंचमी या कार्यक्रमाचे आयोजन 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.
सेवाधम वाचनालयाच्या प्रांगणात पार पडणा-या या कार्यक्रमात झकास विनोद, फर्मास किस्से, विनोदी कविता, अफलातून नाट्य, प्रहसनांचा पंचरंगी कार्यक्रम सादर करण्यात येईल.
या मनोरंजनात्मक कार्यक्रमास उपस्थिती लावून नागरिकांनी हास्य मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सर्व सभासदांनी केले आहे.