ताज्या घडामोडी

राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत तळेगावातील खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेळाडूंची रौप्य व कांस्य पदकाची कमाई

 

तळेगाव : गोवा मडगाव येथे 16 ते 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत इंद्रायणी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी यश मिळवित चमकदार कामगिरी केली आहे.

सबजूनियर,जूनियर,सीनियर मास्टर गटात ईक्यूप व अनयुक्यूप स्पर्धेत नितीन म्हाळस्कर यांनी 80 किलो गट मास्टर 1 मध्ये 145 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवले.

तर याच जिमच्या राजश्री वाघचौरे यांनी 76 किलो वजन गटात मास्टर 1 मध्ये 75 किलो वजन उचलून रौप्यपदक व कांस्यपदक पटकावले.

या स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही खेळाडूंची डिसेंबरमध्ये तुर्की येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!