ताज्या घडामोडी

श्री संत माऊलीकृपा दिंडीतील मृत महिला वारकऱ्यांचे वारसांना आडीच लाखाची मदत रमेशचंद्रजी व्यास यांचेकडून सुफूर्त

लोणावळा :  संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी एकादशी निमित्ताने खालापूर ते आळंदी या दिंडीला अपघात होऊन त्यात गंभीर मरण पावलेले पाच महिला वारकरी यांचा दशक्रियाविधी ता.६ रोजी धाकटी पंढरीच्या (साजगाव ) येथे संपन्न झाला. उंबरे गावातील ता. खालापूरातील श्री संत माऊलीकृपा चॕरिटेबल ट्रस्टच्या दिंडीतील मृत पाच महिला वारकऱ्यांचे वारसांना प्रत्येकी पन्नास हजारांची मदत मावळ तालुका वारकरी संप्रदायातील  रमेशचंद्रजी व्यास यांचेकडून धनादेशाद्वारे सुफूर्त करण्यात आली.

सामुहीक दशक्रियाविधी कार्यक्रमास उपस्थित राहून ही आर्थिक मदत देण्यात आली.तसेच उर्वरित जखमी वारकरी यांना ही मदत देण्यात आली. साते फाटा , ता.मावळ जि.पुणे येथे खालापूर येथील उंबरे गावातील संत माऊलीकृपा चॕरिटेबल ट्रस्टचे दिंडीमधील वारकरी यांना दुर्दैवी अपघात झाला.त्यामधील मृत ५ महिला वारकऱ्यांना मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ व ए वन चिक्की चे मालक आणि राजस्थानचे वारकरी सांप्रदायचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रमेश सिंहजी व्यास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकी ५०,०००/- रु.(पन्नास हजार रुपये) मदत त्याच दिवशी जाहीर केली होती.

त्या पाच महिला वारकऱ्यांचा सोमवार ता.६ रोजी धाकटी पंढरी (साजगाव) ता,खालापूर जि.रायगड या ठिकाणी दशक्रियाविधी होता. निमित्त जाऊन त्यांच्या कुटुंबाचे या ठिकाणी दशक्रियाविधी निमित्त जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. व त्या ठिकाणी ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे यांची प्रवचन रुपी सेवा झाली.

यावेळी ए वन चिक्की चे डायरेक्टर ह.भ.प.  रमेश सिंहजी व्यास , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास पडवळ, सुभाष महाराज पडवळ यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते .शिवाजीराव पवार , संचालक संत तुकाराम कारखाना, ). बजरंग घारे,सागर शेटे,शांताराम लोहोर,वैष्णवी महाराज कडू आदी उपस्थित होते.

दुर्दैवी आपघातात मरण पावलेल्या पाच महिला वारकरी महिलांमधे .कै.सविता वाळकू येरम (रा.उंबरे ता.खालापूर जि.रायगड ),कै.विमल सुरेश चोरगे ( रा.बिड्खुर्द ता.खालापूर जि.रायगड ), कै.ताई बबन वाघमारे ( रा. बिड्खुर्द ता.खालापूर जि.रायगड ), . कै.जयश्री आत्माराम पवार ( रा.भूतिवली ता.कर्जत जि.रायगड ) कै.संगीता वसंत शिंदे( रा.साळोख ता.कर्जत जि.रायगड ) यांचा यात समावेश आहे.

यांचे कुटूंबातील व्यक्तीच्या हातात प्रत्येकी पन्नास हजाराचे धनादेश सुफूर्त करण्यात आले .तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांचे नातेवाईक यांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत देण्यात आली,असे मावळ तालुका सांप्रदाय मंडळांच्यावतीने तसेच श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास यांचेकडून प्रसिद्धीस देण्यात आले. दानशूर व श्रीमंत श्री.रमेशचंद्रजी व्यास ,( प्रदेशाध्यक्ष , वारकरी सांप्रदाय राजस्थान ) यांचेतर्फे दरवर्षी लोणावळ्याचे गवळीवाडा येथील श्रीराम मंदिराजवळ कोकणदिंडीचे स्वागत चहा , अल्पोपहार व अन्नदान या माध्यमातून करण्यात येते. या कार्यात श्रीराम मंडळांच्या सभासदांची मदतही जेवण वाटपासाठी होत असते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!