ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात उद्या लोक अदालत

पुणे : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात उद्या शनिवारी (दि. 11 डिसेंबर) रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोक अदालतीत 90 हजार 500 दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी व 53 हजार प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली आहे. तसेच यावेळी चलनाद्वारे तडजोडीची व दंडाची रक्कम भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने व नागरिकात आपसात तडजोडीने मिटवण्यासाठी लोकअदालत घेण्यात येत आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!