ताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात

नांदेड : नांदेड येथील किनवट येथे ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्याव्यात आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जोपर्यंत राज्य सरकार ओबीसींचा ‘इम्पेरिकल डेटा’ उपलब्ध करून देत नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. अन्यथा ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत तो गप्प बसणार नाही. यासाठी आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक भाजप ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे, अनुसुचित जमातीचे जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, सुनिल मच्छेवार, विश्वास कोल्हारीकर, शेखर चिंचोलकर, शिवा क्यातमवार, फेरोज तंवर, उमाकांत कर्‍हाळे, स्वागत आयनेनीवार, नरसिंग तक्कलवार, गजानन बंडेवार, नगरसेवक शिवा आंधळे, जय वर्मा, सुनिल चव्हाण, संतोष मरस्कोल्हे, राजेंद्र भातनासेसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!