ताज्या घडामोडी

वाराणशीमधील काशी विश्वेश्वर मंदिरातील पंतप्रधानांचे हस्ते पूजा , आरती व लोकार्पण सोहळ्याचे सिध्देश्वर महादेव मंदिरात थेट प्रक्षेपण

लोणावळा :  वाराणशीमधील काशी विश्वेश्वर मंदिरातील पंतप्रधानांचे हस्ते पूजा , आरती व लोकार्पण सोहळ्याचे सिध्देश्वर महादेव मंदिरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाजपच्या लोणावळा मंडलच्यावतीने शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदींच्या प्रमुख उपस्थितीमधे चार पाच ब्राम्हण पुरोहीत यवेळी आभिषेक व पूजेसाठी मंदिरात उपस्थित होते.

सोमवार व मार्गशीष महिना असा दुग्धशर्करायोग असल्याने पंतप्रधानांचे हस्ते झालेल्या या वाराणशीमधील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

यावेळी गटनेते देविदास कडू , नगरसेवक ललीत सिसोदिया , नगरसेविका बिंद्रा गणाञा , रचना सिनकर , मंदा सोनवणे आदी उपस्थित होते. रायवूड येथील श्री.सिध्देश्वर मंदिरात यावेळी पूजा , अभिषेक तसेच खिचडी प्रसादाचे वाटप मान्यवरांचे उपस्थितीमधे करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!