ताज्या घडामोडी

तळेगाव आगारात दत्त जयंती सोहळा साजरा

तळेगाव दाभाडे : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आगारात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. एसटी महामंडळातील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी काम बंद संपावर असून मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संपातही दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी एसटी कामगारांच्या वतीने जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या पडत्या काळात किशोर आवारे आमच्या पाठीशी ठाम उभे राहिले .संपकाळात आम्हाला दोन वेळ पोटभर जेवण त्यांनी दिले. तसेच महिनाभराचा किराणा भरून दिला. संपूर्ण महाराष्ट्रात किशोर आवारे यांच्यासारखे सहकार्य कोणी केले नसेल अशा शब्दात एस टी कामगार संघ अध्यक्ष दीपक दगडखैर यांनी आभार मानले.

दत्त जयंतीनिमित्त सकाळी अभिषेक व पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भजन व महाप्रसाद वाटण्यात आला. यावेळी प्रमोद नखाते, धनंजय मुंडे, बाळासाहेब करवंदे ,प्रशांत शेवाळे ,पांडुरंग बांदल ,रामेश्वर दहिफळे यांनी आयोजनात सहभाग नोंदवला.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!