ताज्या घडामोडी
भामा-आसखेड येथे सातबारावरील शेरे काढण्यासाठी जलसमाधी आंदोलन
उरळी कांचन : खेड, हवेली ,दौंड तालुक्यातील भामा-आसखेड येथे सातबारा उताऱ्यावरील कब्जेदार सदरी असणारे शेरे काढण्यासाठी मरकळ ग्रामस्थांच्यावतीने संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .आंदोलनात संदीप भोंडवे, किरण लोखंडे ,प्रसाद घेनंद, तुकाराम वहिले ,संभाजी ढमढेरे, पाटील गवारे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.