ताज्या घडामोडी

लोणावळ्यात इंद्रायणी नदीतील मारूती मंदीर परिसर व इंद्रायणीनगरचे खुल्या गटाराचे प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोणावळा : लोणावळ्यात मारूती मंदिर , भांगरवाडी व इंद्रायणीनगर या भागातील खुल्या गटाराचे दूषित सांडपाणी पविञ इंद्रायणीनदी पाञात सोडल्याने व येथील भुयारी गटार नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी पहाणारे नागरिकांना व पर्यटकांना तसेच येथील रहिवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आमदार ,खासदार आणि केंद्रातर्फे या भागातील घाटाचे बांधकाम करावे ,तसेच येथे भुयारी गटाराचे काम करून नदीपाञ शुध्द व स्वच्छता आणि सुशोभिकरणाचे काम मार्गी लावावे ,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाराणशीमधील करोडो रूपयांचे नमामी गंगे या उपक्रमाप्रमाणे या इंद्रायणीनदीतील गाळ व माती काढून , जलपर्णी काढून नदीपाञ स्वच्छ करावे ,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इंद्रायणीनदीचे उगमस्थान नागफणी , कुरवंडे येथे असून नदीचे काठावर वारकरी सांप्रदायाचा पाया रचणारे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचे आळंदी या तीर्थ क्षेत्रात संजीवन समाधी मंदीर आहे. नदीच्या तीरावर श्री सिध्देश्वर महादेव मंदिर असून सोन्याचा पिंपळ आहे. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे श्री क्षेत्र देहू येथे मंदीर आहे. तसेच वैकुंठगमन मंदीर व गाथा मंदीर आहे.

कामशेत येथील वाडीवळे येथील संगमेश्वर महादेव मंदिराजवळ नद्यांच्या संगमामुळे कामशेत पासून नदीपाञात पाण्याची वाढ होते. कार्ला येथे एमआयडीसी हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे.इथे बोटींगची सोय असते. नदीपाञ नांगरगाव , वलवण , डोंगरगाव , सदापूर , वाकसई , कार्ला , मळवली , ताजे,पिंपोळी , देवले या गावाजवळून जाते . काही गावांना यानदीचे पाण्याचा पुरवठा थेट आणि जलशुध्दीकरण प्रकल्पाचे माध्यमातून होत आसतो. किमान कामशेत पर्यत नदीपाञ खोल व रूंद केल्यास तसेच कार्ला पूल ,सदापूर पूल ,डोगरगाव , देवले हद्द,मळवली हद्द,बोरज हद्द येथे के.टी बंधारे बांधावे , आशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पीएमआरडीए चे विरोधात ता.३ जानेवारी २०२२ रोजी इंद्रायणीनदीचे पाञ खोल खोदावे , या मागणी साठी श्री एकविरा कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!