ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषदेचे रिक्षा फिरवून मास्क वापरण्याचे आवाहन

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आज शहरातील सर्व प्रभागात रिक्षा वर कर्णा लावून माईकमधे नागरिकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क लावावा , प्लॕस्टीक पिशव्यांचा वापर करू नये , तसेच सोशल डिस्टंटीँगचे पालन करावे , असे अवाहन करण्यात आले आहे.

मास्क न वापरणारे नागरिक , दुकानदार आणि पर्यटकांनी या सूचनांचेपालन करावे ,अन्यथा दंड भरावा लागेल ,असे विनंती व सूचना देणारे अवाहन करण्यात आले आहे.दंड वसुलीबाबत लोणावळा शहर पोलिसांनी याबाबत काही आदेश आला नसल्याचे ठाणे अंमलदार यांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

लोणावळा शहरात तोकडे कपडे घालणाऱ्या पर्यटकांवर नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांचे कारवाई केली जाईल का ? असा प्रश्न स्थानिक दुकानदारांनी व नागरिकांकडून विचारला जात आहे.

काही तरूण तरूणी किंवा फ्रेंड सर्कल मधील जोड्या , मौजमजा मस्ती करण्यासाठी येतात. या मधे नवविवाहीत कपलही असतात. काही कंपनीचे , शाळा , महाविद्यालयाचे ग्रूपही येतात.; तर काही कुटूंबातील लोक पर्यटनस्थळ पहाण्यासाठी येतात. काही कपड्याचे दुकानात बाहेर महिलांचे लज्जास्पद फोटो असलेल्या जाहीराती दिसतात.यांचेवर कुणाचा तरी अंकुश असायला हवा.

राञीच्या वेळी राज्यात नऊ ते पहाटे सहा असा संचारबंदीचा आदेश असल्याने नाताळ व थर्टी फर्स्ट च्या राञी पर्यटकांनी गर्दी करू नये , तसेच सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा घालू नये , सूचनांचे पालन करावे असे कडक निर्बंध लावले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!