लोणावळा नगरपरिषदेच्या विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ आयेशा झुल्का यांचे उपस्थितीमधे संपन्न
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ आयेशा झुल्का यांचे उपस्थितीमधे संपन्न झाला. यावेळी जिंगल बेल , वाॕल पेंटींग, शाॕर्ट मुव्हीज, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा या स्पर्धेत बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थी व नागरिकांचा पुरस्कार व रोख रक्कम देवून सिनेअभिनेञी आयेशा झुल्का , लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , सुधीर शिर्के ,गटनेते देविदास कडू, सुवर्णा अकोलकर , संध्या खंडेलवाल , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , नगरसेविका मंदा सोनवणे , यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सिनेअभिनेञी आयेशा झुल्का म्हणाल्या , मी वरसोवा येथे असाच कचरामुक्तीसाठी प्रकल्पाचे कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. सुमारे सात टन कचरा या भागात जमा केला गेला.एनसीसी चे विद्यार्थी यामधे सहभागी झालेले होते.
यावेळी मला लोणावळ्याची ब्रँडअँबॕसिटर म्हणून विशेष गौरविण्यात आले.याचे सर्व श्रेय लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांना जाते. आम्ही डाॕग साठी खाणा पिना यासाठी वेगळी व्यवस्था केली , हे छोटे काम मुंबई सारख्या ठिकाणी चालले पाहिजे. मुक्या प्राण्यांच्या पोटी माणुसकी दाखवणे हे आपले कर्तव्य आहे ,असे त्या म्हणाल्या .लोणावळ्याच्या नगराध्यक्षा म्हणाल्या , सिनेअभिनेञी आयेशाजी झुल्का यांनी डाॕग साठी लोणावळ्याच्या अनेक कोपऱ्यात व्यवस्था केली आहे. भारतात कुठेही अशी व्यवस्था नाही.त्यामुळे आपल्याला दुसरा क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकाच्या करीता असेच सर्वांचे सहकार्य मिळावे,अशी मी विनंती करते.
यावेळी आयेशाजी झुल्का यांनी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांना राष्ट्पती पारितोषिक घेतानाचा फोटो व शाल देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाॕर्ट फिल्म मधे प्रथम क्रमांक विजेते सचिन कुटे, निबंध स्पर्धेत सर्वज्ञा गंजाळे ,प्रथमेश , पोस्टर स्पर्धेत नितीन कल्याण, जिंगल स्पर्धेत प्रदिप वाडेकर, तसेच रिदम ग्रूप यांनी पुरस्कार मिळवले.