ताज्या घडामोडी

कार्ला फाट्यावरील अपघातांना बसणार आळा

सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या वतीने कार्ला येथे टेक्निकल अर्बनिझमचा प्रयोग

कार्ला : जुना मुंबई – पुणे महामार्गावरील कार्ला येथील चौकातून जीवघेणा अपघातांची संख्या कमी करण्यासह शून्य मृत्यू दरासाठी सेव लाइफ फाउडेशन प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी कार्ला फाटा येथे भारतातील पहिला टेक्निकल अर्बनिझमचा प्रयोग केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन व सेव लाइफ फौंडेशन यांच्या सहकार्याने कार्ला फाटा येथे रस्ता क्रॉसिंग आधिक सुरक्षित करत व मार्गाची पुनर्रचना करत टेक्निकल अर्बानिझम चाचण्या सुरू केल्या आहेत.

महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांना वळण्यासाठी किंवा मार्गास छेद दिल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामंडळाकडून काही ठिकाणचे असुरक्षित छेद रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र गावांच्या ठिकाणी असलेल्या दुभाजकामुळे झालेल्या अपघातात अनेक दुर्दैवी नागरिकांचे बळी गेले आहेत. पादचारी सायकल स्वार वाहनचालकांसाठी रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्त्यांची शहरी रचना, वाहतूक नियोजन आणि पायाभूत सुविधांमधील बदलांसाठी सेव लाइफ फौंडेशन तर्फे पुढाकार घेण्यात आला. महामार्गावरील रस्त्यांचा दोन वर्षे अभ्यास करून सर्वेक्षण करण्यात आले असे सेव लाईफ फाउंडेशन चे डायरेक्टर करूना रैना यांनी मत व्यक्त केले.

कार्ला फाट्यावर एका तासात सरासरी २५० पादचारी रस्ता ओलांडतात. ४५०० वाहने पास होतात. २०१८ ते २०२० या कालावधीत १८ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू तर २३ गंभीर जखमी झाले. कार्ला फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर पादचार्‍यांना थांबण्यासाठी जागा नव्हती आणि महामार्गावरील जंक्शन गावकरी वापरत असल्याने संघर्ष मोठ्या प्रमाणात होत होता. सेव्ह लाईफ फाऊंडेशनन हाती घेतलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे यामुळे कार्ला फाटा वरील अपघातांना आळा बसेल.

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!