ताज्या घडामोडी

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने कोकण पूरग्रस्तांना मदतीचा हात

तळेगाव : कोकणातील चिपळूण, महाडमध्ये पुराने प्रचंड हानी झाली आहे.  कोकण वासीयांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेनं धाव घेतली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले व प्रांतिक कार्याध्यक्ष मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या सहकार्याने मी वडार महाराष्ट्राचा इंदापुर तालुक्याच्या वतीने  पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत डाळ, तांदूळ, साबण, तेल अशा जीवनावश्यक साहित्याचे किट असलेले २ टेम्पो संघटनेच्या वतीने रवाना करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष विजय चौगुले, मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, दीपक माने, रोहित धोत्रे, अजय धोत्रे, योगेश गाडेकर, राजेंद्र गायकवाड, गणेश भोसले, पुष्पराज गायकवाड, अमन चव्हाण, गौरव सोनवणे, विजय धोत्रे, निवृत्ती फलके, मा. नगरसेवक गोपाळ परदेशी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!