ताज्या घडामोडी

भांगरवाडीतील चौकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण

लोणावळा : भांगरवाडीतील लोहगड दर्शन येथील मुख्य चौकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असे नामकरण करण्यात आले. माजी आमदार दिगंबर भेगडे व नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

लोहगड दर्शन उद्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आहे. या चौकाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे यासाठी प्रदीप थत्ते व नगरसेवक देविदास कडू यांनी पाठपुरावा केला होता.मागील सभेत सभागृहाने या विषयाला मान्यता दिली. या चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले.

या कार्यक्रमास अरुण कुलकर्णी यांनी सावरकरांविषयी प्रबोधन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार खिरे मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाला लोनपा नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव , मा. आमदार दिगंबरदादा भेगडे, उपनगराध्यक्ष दिलीपजी दामोदरे , मा. उपनगराध्यक्ष श्रीधरजी पूजारी , भाजपचे गटनेते देवीदासजी कडू , नगरसेवक ललित सिसोदिया , लोनपा शिक्षण मंडळ उपसभापती प्रदीप थत्ते , वृक्ष प्राधिकरण सदस्य हर्षल होगले , सुधीर राईलकर , दत्ता खिरे , चंद्रकांत फडके , विनय देशपांडे , योगिताताई कोकरे , अनुप देव , आशाताई लपालीकर , मा. नगरसेवक राजाभाऊ खळदकर , श्रीया रहाळकर , प्रविण रोकडे , प्रफुल् काकडे , प्रियाताई पाटील , चंद्रकांत जोशी आणि अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते .

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!