बाळासाहेब नेवाळे यांचे रद्द झालेले संचालक पद कायम
पुणे : सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब नेवाळे यांचे संचालकपद रद्द झाल्याबाबत पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी (दुग्ध) संस्था यांनी आदेश दिला होता. नेवाळे यांनी याविरोधात पुनर्निरीक्षण अर्ज राज्याचे सहनिबंधक यांच्याकडे केला सहनिबंधक बी. एल .जाधव यांनी नेवाळे यांचे संचालकपद कायम ठेवले आहे .पुणे विभागीय उपनिबंधकांचा आदेश त्यांनी रद्द केला आहे.
कामशेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत नेवाळे यांना अटक झाली होती. त्यामुळे ते 22 फेब्रुवारी ते 22 जुलै या काळात न्यायालयीन कोठडीत असल्याने सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिले. त्यामुळे दूध संघाने त्यांचे सदस्यत्व रद्द ठरवले.तसा आदेश 22 ऑक्टोबर रोजी काढला
या आदेशा विरोधात नेवाळे यांनी सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल केले होते .यावेळी वादी व प्रतिवादी यांचे वकीलांचे लेखी म्हणणे व तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर सहनिबंधक बी. एल .जाधव यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था यांचा आदेश रद्द करत बाळासाहेब नेवाळे यांचा पुनर्निरीक्षण अर्ज मंजूर केल्याने नेवाळे यांचे संचालकपद अबाधित राहिले आहे.